मनविसे शहराध्यक्षांवरील हल्ला प्रकरणाला कलाटणी; पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक



 उल्हासनगर :-- मनोज शेलार यांनी उल्हासनगर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागातील भष्टाचार उघड केले आहेत. याच कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगत, उल्हासनगर महापालिकेतील आणखी भष्टाचार आपण उघड करणार आहोत, असे शेलार यांनी सांगितले होते. तसेच, आपण शिक्षण मंडळाचे अनेक घोटाळे उघड केले असून त्यातूनच आपल्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप शेलार यांनी केला होता.

उल्हासनगर - उल्हासनगर मनविसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावरील तलवार हल्ला प्रकरणाला कलाटणी मिळाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला बालकल्याण अधिकाऱ्याचे नाव पुढे आल्याने त्यास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सचिन वानखेडे, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तसेच, शेलार यांचा मागोवा घेऊन आरोपींना माहिती पुरवणारा संतोष पगारे याचा देखील याप्रकरणात सहभाग असल्याचे समोर आल्याने आज दोघांनाही अटक करण्यात आली.


मनवीसे अध्यक्षांवरील हल्ला प्रकरणाला कलाटणी;- पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक ,विशेष म्हणजे, यापूर्वी याच गुन्ह्यात हल्ला करण्यासाठी ७० हजाराची सुपारी घेणाऱ्यासह ४ हल्लेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यत ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने चार हल्लेखोरांना महिन्याभरानंतर अटक केली होती. मात्र, हल्ल्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याने या हल्ल्याचे गूढ वाढले आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या एका आरोपीने ७० हजार रुपयात मनोजला ठार मारण्याची सुपारी घेतल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. यापूर्वीच हल्लेखोर साजिद मोहंमद अकील शेख (वय १९, रा. काळा तलाव, कल्याण) दीपक हरेराम तिवारी (वय १८, रा. कोनगाव, भिवंडी) रोहित इंद्र कांबळे (वय १९, रा. बारावे, कल्याण) अक्षय विनोद गिरी (वय २०, काळा तलाव, कल्याण) यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सहावर गेली आहे.


सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनवरून हल्लेखोरांचा मागोवा-

शेलार हे ८ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमाराला अंबरनाथमधील शिवमंदिराला जाणाऱ्या गोविंद पुलाजवळील परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आले होते. यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यांनतर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून स्थानिक पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, हल्याच्या दिवशी परिसरातील मोबाईल लोकेशनवरून तपासाला गती दिली. यात चारही हल्लेखोरांना विविध ठिकाणांवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ७० हजार रुपयात मनोज शेलार यांना मारण्याची सुपारी धर्मेंद्र परिहार नावाच्या व्यक्तीने दिली. त्यापैकी ३० हजार दिल्याची कबुली यातील हल्लेखोर साजिद मोहंमद अकील शेख याने पोलिसांना दिली आहे. आता पोलीस सुपारी देणाऱ्या धर्मेंद्र परिहारचा शोध घेत आहे.


विविध विभागातील भष्टाचार उघड केल्याने हल्ला-

मनोज शेलार यांनी उल्हासनगर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागातील भष्टाचार उघड केले आहेत. याच कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगत, उल्हासनगर महापालिकेतील आणखी भष्टाचार आपण उघड करणार आहोत, असे शेलार यांनी सांगितले होते. तसेच, आपण शिक्षण मंडळाचे अनेक घोटाळे उघड केले असून त्यातूनच आपल्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप शेलार यांनी केला होता.


आरोपी अधिकाऱ्याची पोलीस कोठडीत रवानगी-

उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी सचिन वानखेडे यांच्यासह या हल्ल्यामागे आणखीन कुणी आहे काय? याची चौकशी सुरू असून, आरोपी अधिकारी वानखेडे आणि संतोष पगारे या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेव्हणी घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी पकडली

आमदार किसन कथोरे कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान