प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाची मनसे सैनिक कडून तोडफोड

 


उल्हासनगर - शासकीय भूखंडावर कब्जा करणाऱ्या भूमाफियांविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप करत, उल्हासनगर विभागीय प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाची एका मनसेच्या पदाधिकाऱ्याने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. योगीराज देशमुख असे या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते उल्हासनगर मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे कार्यालयाच्या आवारात या शासकीय वाहनाची फोडफोड केल्याने सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रांताधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याने घडला प्रकार

उल्हासनगर मनसेचे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांनी उल्हासनगरचे उपविभागीय दंडाधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या वाहनाची तोडफोड केली. हा सर्व प्रकार मोबाईमध्ये कैद झाला आहे. उल्हासनगरमध्ये शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकाम होत आहे. त्या संदर्भात वारंवार तहसीलदार आणि प्रांताधिकारी गिरासे यांना माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. मंगळवारी योगीराज देशमुख हे प्रांताधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले असता, त्यांना भेट नाकारण्यात आली. भेट नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या देशमुख यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेव्हणी घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी पकडली

आमदार किसन कथोरे कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान