साधा फोन कॉल करणेही या ग्राहकांना अवघड.

(एमटीएनएल) चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..


शहाड:-एकेकाळी महानगर टेलिफोन निगम लि.चा (एमटीएनएल) मोबाइल नंबर मिळावा म्हणून ग्राहक रांगेत उभे राहत होते. आता तेच ग्राहक मोबाइल फोनची रेंज मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. थ्रीजी नेटवर्क तर दूरच, साधा फोन कॉल करणेही या ग्राहकांना अवघड होऊ लागले आहे.कल्याण सारख्या महानगरराच्या हाकेच्या अंतररावरील शहाड पश्चिम भागात महानगर टेलिफोन निगम लि.चा (एमटीएनएल) ग्राहकांना मोबाइल फोनची रेंज आहे मात्र साधा फोन कॉल करणे आणि कॉल येणे मृत आवश्यतेत असल्याचे दिसून येते.सध्या राज्यातील लोकडाऊन असल्यामुळे शाळा ऑनलाईन सुरू आहे.त्यामुळे एमटीएनएलच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा,ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे.

 ग्राहकांनी वारंवार तक्रार दाखल करून सुद्धा  कोणतीही कारवाई केली जात नाही.टॉवर असून देखील कॉल येत जात नाही मग टॉवरच भाडं अधिकारी कोणाच्या घशात घालता हा प्रश्न ग्राहक उपस्थित करत आहे. ऍड ज्ञानेश्वरहर देखमुख यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली असून मात्र गेल्या 2 पासून हे अधिकारी कोणतेही उत्तर देत नाही.खाजगी कंपनी जिओ(jio टेलिकॉम) आल्यापासून एमटीएनएल अधिकारी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ऍड ज्ञानेश्वरहर देखमुख यांनी केला आहे.
अनेकांनी जवळपास 2 वर्ष होऊन गेले तरी कंपनी यावर काहीच करत नाही याबद्दल राग व्यक्त केलाय. त्यांचा 1500  हा हेल्पलाईन क्रमांकही लागत नसल्याचं सांगण्यात येतंय.
त्यावरुन त्यांनी कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करून देखील कंपनी त्याची दखल घेत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
 तर नक्कीच एमटीएनएल अधिकारी आणि खाजगी टेलिकॉम कंपनी यांच्यात भ्रष्टाचार होत आहे.शासनचा पगार घेऊन काम मात्र खाजगी टेलिकॉम कंपनीच काम हे अधिकारी करत आहे.तरी यावर कारवाई  मागणी ऍड ज्ञानेश्वरहर देखमुख यांनी केली आहे.अन्यथा अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारं असल्याचं सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेव्हणी घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी पकडली

आमदार किसन कथोरे कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान