तोंडातील अल्सरने हैराण झालात? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील गुणकारी


सध्या उन्हाळा सुरू असाल तरी अनेकांना घराबाहेर पडता येत नसल्याने उष्णेतची दाहकता जरा कमीच जाणवत आहे. बाहेरच्या कडकडीत उन्हापासून तुमची सुटका झाली असली तरी घरातही गरम होतंच. मग त्यासाठी तुम्ही पंखा, एसी, कुलर चालू करून थंडावा घ्याल. अशाने तुम्हाला वरवर थंड जरुरू वाटेल पंरतु शरीरात निर्माण होणाऱ्या उष्णेतचं काय कराल. शिरातील वाढत्या उष्णेतेमुळे अनेक समस्या उद्भवतात. काहींच्या हाता पायाची आग होते, त्वचेचं इन्फेक्शन, घामोळ्या, लघवी करताना जळजळ होणं, तोंडतील अल्सर अशा काही समस्या उद्भवतात. त्यातही तोंडातल्या अल्सरमुळे तुमचं खाणं पिणं कठीण होऊन जातं. काहींची ही समस्या एक ते दोन दिवसात जाते, तर काहींना दहा दिवस उलटूनही आराम मिळत नाही. त्यामुळे आज आपण घरगुती सोप्या उपायांनी तोंडाचं अल्सर कसं दूर करता येईल ते पाहू.


हळद



ळद औषधी असल्याने ती बहुतांश समस्यांवर गुणकारी ठरते. हळद अँटीसेप्टिक असल्याने जखमेवर लावल्यास त्याचा परिणाम जाणवतो. अल्सर ही देखील एक प्रकारची जखमच असते. त्यामुळे दुधात हळद मिस्क करून तुम्ही त्याचं सेवन करू शकता.


मध



मध हे तोंडातील अल्सरसाठी गुणकारी ठरतं. आद्रता निर्माण करण्याचा नैसर्गिक गुणधर्म त्यात असल्याने डिहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. मधातील अँटी मायक्रोबियल घटांमुळे तोंडाचं अल्सर लवकर भरण्यास मदत होते.


तुळस



तुळशीत औषधी गुणधर्म असल्याने ते अल्सरसाठी देखील गुणकारी ठरतं. तुळशीच्या पानात अँटीबॅक्टरीअल, अँटीव्हायरल गुण असतात. त्यामुळे तुळशीच्या पानाच्या सेवनाने व्हायरस आणि बॅक्टरीया कमी होण्यास मदत होते. २ ग्लास पाणी घ्या त्यात १० ते १२ तुळशीची पानं टाका. त्यानंतर पाणी उकळून घ्या. पाणी थोडं थंड झाल्यावर त्यात मीठ घाला आणि गुळण्या करा. सलग दोन दिवस असं केल्यास तुम्हाला फरक जाणवेल.


नारळ



तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी नारळ देखील ऊत्तम पर्याय आहे. नारळाचं तेल आणि पाणी, सुखं खोबरं या तिन्ही घटकांमुळे अल्सरपासून आराम मिळण्यास मदत होते. नारळाचं पाणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसंच सुखं खोबरं चघळून खाल्यास त्याचा फरक तुम्हाला जाणवले.


खसखस 



खसखस शरीरात थंडावा निर्माण करण्याचं काम करतं. त्यासाठी खसखसच्या बिया ठेचून त्यात साखर टाकून खा. अशाने अल्सरपासून आराम मदत होईल.


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेव्हणी घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी पकडली

आमदार किसन कथोरे कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान